गरज

सेंद्रिय भाजीपाल्याची गरज 


आपल्या आहारात भाज्यांचे स्थान खूप महत्वाचे आहे.  रोजच्या एकूण जेवणाच्या २० टक्के भाजीचे सेवन होते. भाजीतून आपल्याला बरीचशी खनिजे, विटामिन व इतर मुलद्रव्ये मिळतात.  पण रोज साधारणतः २०० ग्रॅम भाजीत, ४० पेक्षा जास्त रासायनिक औषधांची फवारणी केल्यानंतर राहिलेले अंश असतात,   जे आपल्या स्वास्थ्याला फारच घातक असतात. आपल्यापर्यंत पोचणारा भाजीपाला सुंदर दिसावा व थोड्या वेळात जास्त रासायनिक खते वापरून जास्त पिक घेता यावे म्हणून शेतकरी रासायनिक खाते व औषधे वापरतात. अशा भाज्या खाल्याने लहान मुलांमध्ये जन्मजात व्यंग, मज्जातंतूचे विकार, कर्करोग इ. रोग जास्त प्रमाणात आढळून आले आहेत. मुलांची प्रतिकारशक्ती पण मंदावली आहे. परिणामी लहान मुलांचा आरोग्याचा पायाच कमकुवत झाला आहे.

शरीराचे भरण पोषण व सरंक्षण करण्या ऐवजी निःसत्व व विषमय असे आजचे अन्न हेच आपल्या आजाराचे प्रमुख कारण बनले आहे



सेंद्रिय भाजीपाल्याचे महत्व






सेंद्रिय आहार हा जास्त पोषक असतो. या प्रकारे पिकविलेल्या भाजीत केलेल्या परीक्षणात खालील बाबी आढळून आल्या


सेंद्रिय पिकांमध्ये पोलीफेनोल, लायाकोपेन व इतर फायटोनुत्रिएनट [ वनस्पतींची सरंक्षक द्रव्ये ] नेहमीच्या पिकांपेक्षा १०% ते २०% जास्त असतात.

याच संरक्षक घटकांमुळे आपली प्रतिकार शक्ती जास्त चांगली होते.


सेंद्रिय भाजीपाला हि काळाची गरज आहे