सेंद्रिय आहाराच्या चळवळीत सगळ्यांचाच सहभाग असणे आवश्यक आहे. आपल्याला विविध सकस सेंद्रिय उत्पादनांचा सातत्याने पुरवठा हे आमच ब्रीदवाक्य आहे. याच बरोबर शेती व्यवसायातील अनिश्चितता , अडचणींची आपल्याला जाण असावी.
राहण्याच्या किंवा कामाच्या जागी आपण गट बनवून पुढाकार घेतल्यास व्यवहार अधिक सुकर होईल.
१० किंवा त्यापेक्षा अधिक जणांचा गट केल्यास आपल्याला एका ठिकाणी घरपोच भाजी पोचवता येईल
आमच्या शेतीला अवश्य भेट द्या व आपल्या मातीशी नाते जुळू द्या म्हणजे आपण जो माल घेतो तो कसा पिकतो हे कळेल व विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल
आम्ही सेंद्रिय शेतकरी तर आपण सेंद्रिय ग्राहक
